पीएसएलव्हीच्या प्रक्षेपणात अपयश   

पृथ्वी पाहणी उपग्रहही कक्षेत नाही

श्रीहरिकोटा : ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान रॉकेटचे (पीएसएलव्ही सी ६१) प्रक्षेपण करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला रविवारी अपयश आले. पर्यायाने त्यावरील पृथ्वी पाहणी उपग्रह (ईओएस ०९) अवकाशातील कक्षेत स्थिर करता आला आहे. पीसएलव्ही श्रेणीतील रॉकेटची आतापर्यंत १०० उड्डाणे यशसवी झाली होती. मात्र, कालचे त्याचे १०१ वे उड्डाण यशस्वी झाले नसल्याने इस्रोला एक धक्का बसला आहे.
 
डॉ. सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरुन रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण झाले. मात्र, काही मिनिटांतच त्यात बिघाड झाला. पीएसएलव्हीच्या माध्यमातून पृथ्वी पाहणी उपग्रह ईओएस ०९ पाठवला जाणार होता. तो सूर्याच्या समकालिन ध्रुवीय कक्षेत स्थिर करण्याची योजना होती. रॉकेट दुसर्‍या टप्प्यापर्यंत व्यवस्थित काम करत होते. तिसर्‍या टप्प्यातील बिघाडामुळे त्याचे प्रक्षेपण अयशस्वी झाले. या संदर्भातील पोस्ट एक्सवर इस्रोने टाकली आहे. प्रक्षेपण अपयशी का झाले? याचा अभ्यास करुन त्याबाबत अधिक माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पीएसएलव्ही रॉकेटचे कालचे ६३ वे उड्डाण होते आणि पीएसएलव्ही एक्सएलचे २७ वे उड्डाण करुन १८ मे पूर्वी १०० उड्डाणांचा विक्रम इस्रोच्या नावावर होता. 
 
प्रक्षेपण अत्यंत सातत्यपूर्ण व्हावे आणि जबाबदार अवकाश मोहिमा इस्रो  आतापर्यंत राबवत आला आहे. काल पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला ईओएस ०९ उपग्रहही हा त्या पैकी एक आहे. मोहीम अयशस्वी झाली तरी उपग्रहाच्या सुरक्षेच्यादृष्टीने कक्षाविरहित प्रवासासाठी त्याच्यामध्ये इंधन असल्याचे इस्रोच्यावतीने सांगण्यात आले.

Related Articles